प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी

प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी (प्रोव्हिजनल आयआरए), अधिकृतपणे आयरिश रिपब्लिकन आर्मी तथा प्रोव्होस हे १९६९-२००५ दरम्यान आयर्लंडमध्ये अस्तित्त्वात असलेले एक निमलष्करी दल होते ज्याने उत्तर आयर्लंडमधील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. आयरलंडचे एकत्रीकरण आणि संपूर्ण आयर्लंडमध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक आणणे हा या दलाच लक्ष्य होते. याच्या जवळजवळ संपूर्ण अस्तित्त्वकालात याला युनायटेड किंग्डममध्ये एक दहशतवादी संघटना आणि आयर्लंडच्या प्रजासत्ताकमधील एक बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले गेले होते. या संघटनेने उत्तर आयरलंड तसेच युनायटेड किंग्डम, विशेषतः इंग्लंडमध्ये अनेक हिंसक हल्ले केले होते. यांत ब्रिटिश सुरक्षा दलाच्या अंदाजे १,००० सदस्य आणी ५-६४४ नागरिकांचा समावेश आहे. त्यांना परदेशा राहणाऱ्या आयरिश लोकांचा तसेच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गेनायझेशन आणि लिब्याच्या मुअम्मर गद्दाफीची मदत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →