प्रीती झिंटा (जन्म : सिमला, ३१ जानेवारी १९७५ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली 'दिल से' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
तिच्या दिल चाहता है, कल होना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत. दोन्ही गालांवरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हिची जमेची बाजू मानली जाते..
प्रीती झिंटा
या विषयातील रहस्ये उलगडा.