प्राणहिता नदी

या विषयातील रहस्ये उलगडा.

प्राणहिता नदी

प्राणहिता नदी ही महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एक नदी आहे जी वैनगंगा नदी आणि वर्धा नदीच्या संगमानंतर निर्माण होते. हा संगम महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर तुमडी हेट्टी, कौठला मंडळ सिरपूर (टी) जवळ आहे. अगदी सुरुवातीलाच, नदीचे एक विस्तृत नदीपात्र आहे.

प्राणहिता नदी ११३ किलोमीटरचा एक छोटासा प्रवास पुर्ण करते, जो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांच्या सीमेला लागुन राहतो. अहेरी तालुक्यातील वडलापेठ जवळ प्राणहिता नदीला दिना नदी मिळते. प्राणहिता नदीची दिशा दक्षिणेकडे आहे. तिच्या मार्गावर नदी घनदाट जंगलांनी वेढलेली आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांची समृद्ध जैवविविधता आहे. तिचा छोटासा प्रवास पूर्ण केल्यानंतर, ही नदी कालेश्वरम येथे गोदावरी नदीत वाहते.

ह्या नदी काठावरील अनेक घाटांवर पुष्करम मेळा भरतो. कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प हा ह्या नदीवर २०१९ मध्ये सुरू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →