प्राच्यवादी इतिहासलेखन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अठरव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना " प्राच्यवादी अभ्यासक " असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला " प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →