प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना(इं:Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. याचा मूळ उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात, फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता. याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे कोलकाता येथे ९ मेला झाले. मे २०१५ ला, भारताच्या फक्त २०% लोकांपाशीच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे.या योजनेचे ध्येय हा आकडा वाढवावयाचे आहे.
वैशिष्ट्ये
१) लक्ष्यगट - अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक
२) वय व पात्रता - १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात , लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे .
३) हप्ता- योजनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे १ जून ते ३१ मे असेल .
४) विमा लाभ - लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु . अर्थसाहाय्य मिळेल , लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रु व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रु अर्थसाहाय्य दिले जाते .
५) व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?