पेनेलोपी लाइव्हली

या विषयातील रहस्ये उलगडा.

पेनेलोपी लाइव्हली

डेम पेनेलोपी मार्गारेट लाइव्हली (जन्म १७ मार्च १९३३) ही एक ब्रिटिश लेखीका आहे जी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कल्पित कथा लिहिते. त्यांनी बुकर पारितोषिक (मून टायगर, १९८७) आणि ब्रिटिश मुलांच्या पुस्तकांसाठी कार्नेगी पदक (द घोस्ट ऑफ थॉमस केम्पे, १९७३) दोन्ही जिंकले आहेत.

लाइव्हलींची प्रौढांसाठीची पहिली कादंबरी, द रोड टू लिचफिल्ड, १९७७ मध्ये प्रकाशित झाली आणि ती बुकर पारितोषिकासाठी शॉर्टलिस्ट केली गेली होती. १९८४ मध्ये अकॉर्डींग टू मार्क ही कादंबरी देखील शॉर्टलिस्ट झाली होती. १९८७ मध्ये मून टायगर कादंबरीने ते पारितोषिक जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →