पीअरब्लॉक हे एक मोफत आणि मुक्त-स्रोत (ओपन-सोर्स) वैयक्तिक फायरवॉल सॉफ्टवेर संयोजन आहे हे संयोजन संगणकाचे नेटवर्कवरील संशयास्पद किंवा जाहिरातदार आयपी पत्त्यांचे ब्लॉकलिस्टद्वारे रक्षण करतो. हा कार्यक्रम पीअर-टू-पीअर (P2P) नेटवर्क फाइल शेअरिंगदरम्यान युझरचे गोपनीयता रक्षण करण्यासाठी विशेषतः डिझाइन केला गेला होता. पूर्वीच्या पीअरगार्डियन या लोकप्रिय सॉफ्टवेरची पुढील आवृत्ती म्हणून पीअरब्लॉक विकसित करण्यात आला. विंडोझ ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा प्रोग्राम संगणकातून होणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व नेटवर्क जोडण्यांची सतत तपासणी करतो आणि वापरकर्त्याने बनवलेल्या ब्लॉकलिस्टच्या आधारे विशिष्ट आयपी पत्त्यांवरून येणारी रहदारी आपोआप अडवतो.
पीअरब्लॉक प्रामुख्याने स्पायवेर, जाहिरातदार, सरकारी संस्था, माहितीचे विश्लेषण करणाऱ्या कंपन्या आणि संशयास्पद संस्थांचे आयपी पत्ते ब्लॉक करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये वापरकर्ता स्वतःच्या गरजेनुसार ब्लॉकलिस्ट बनवू किंवा बदलू शकतात. याचबरोबर विशिष्ट आयपी पत्ते मंजूर करू शकतात. तथापि सर्व नेटवर्क रहदारीवर लक्ष ठेवणे आणि ब्लॉक करणे या प्रक्रियेमुळे काही वेळा नेहमीच्या सुरक्षित संकेतस्थळांचा किंवा इंटरनेट सेवांचा वापर करताना अडथळे निर्माण होऊ शकतात. आधुनिक काळातील संगणक सुरक्षेत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे पीअरब्लॉकचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. तरीही आयपी-आधारित नेटवर्क नियंत्रणासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
पीअरब्लॉक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.