पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओज् (/ˈpɪksɑːr/)हा एक अमेरिकन संगणक अॅनिमेशन चित्रपटनिर्मिती स्टुडिओ आहे. त्याच्या गंभीर आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी संगणक अॅनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी हा स्टुडिओ प्रसिद्ध आहे. सामान्यतः फक्त पिक्सार म्हणून ओळखला जातो.
कॅलिफोर्नियाच्या एमरीविले येथे स्थित आहे आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या वॉल्ट डिस्ने स्टुडिओची उपकंपनी आहे.
या अॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अकॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
पिक्सार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?