पाइक्स पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या इतर रांगांपेक्षा किंचित दूर असलेले हे शिखर पाइक्स पीक मासिफ या डोंगरावर आहे. कॉलोराडो स्प्रिंग्ज शहराजवळ असलेल्या या शिखराची उंची १४,२७६ फूट आहे. या शिखरापर्यंत चालत, रेल्वेगाडीने किंवा मोटारकारने जाता येते.
स्पॅनिश शोधकांनी याला सुरुवातीस एल कॅपितान असे नाव दिले होते. त्यानंतर झेब्युलॉन पाइकचे नाव या डोंगरास दिले गेले. या डोंगराला स्थानिक अरापाहो भाषेत हीय ओतोयू असे नाव आहे.
पाइक्स पीक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.