पवित्रासन (लॅटिन: Sancta Sedes, 'सांक्ता सेदेस्', अर्थ: पवित्र खुर्ची; इटालियन Santa Sede [ˈsanta ˈsɛːde], 'सान्ता सेदे'), ज्याला होली सी, रोमचे आसन, किंवा प्रेषितासन असेही म्हणतात, हे कॅथलिक चर्च आणि व्हॅटिकन सिटीचे केंद्रीय प्रशासकीय मंडळ आहे. यामध्ये रोमच्या प्रेषितासनाचे बिशप म्हणून पोप यांच्या कार्यालय होतो आणि ते जगभरातील कॅथलिक चर्च आणि व्हॅटिकन सिटीचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करते. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, पवित्रासनाला सार्वभौम कायदेशीर अस्तित्वाचा दर्जा आहे .
कॅथलिक ऐतिहासिक नोंदींनुसार व परंपरेनुसार, पवित्रासन ची स्थापना पहिल्या शतकात संत पीटर आणि संत पॉल यांनी केली. पीटरचे पोपपद आणि पोपी प्राधान्यामुळे, ते जगभरातील कॅथलिकांसाठी पूर्ण ऐक्यतेचे केंद्रबिंदू आहे. पवित्रासन चे मुख्यालय व्हॅटिकन सिटीमध्ये आहे, जिथून त्याचे कामकाज चालते आणि त्यावर त्याचे "अनन्य अधिपत्य" आहे. व्हॅटिकन सिटी हे रोममध्ये वसलेले एक स्वतंत्र शहर-राज्य आहे, जिथे पोप हे निवडलेले सम्राट आणि म्हणूनच राष्ट्रप्रमुख आहेत.
पवित्रासन १८० सार्वभौम राज्यांशी द्विपक्षीय राजनैतिक संबंध ठेवते, करार आणि संधींवर स्वाक्षरी करते आणि संयुक्त राष्ट्रे आणि त्याचे संस्था, युरोपाची परिषद, युरोपी समुदाय, युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटना आणि अमेरिकी राज्यांची संघटना यासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत बहुपक्षीय राजनैतिक संबंध ठेवते.
पवित्रासन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.