पण लक्षात कोण घेतो (इंग्रजी: बट हू केअर्स...) ही हरी नारायण आपटे यांची १८९० मधील मराठी भाषेतील कादंबरी आहे. आत्मचरित्रात्मक शैलीत लिहिलेली, ही कादंबरी यमुना या तरुण हिंदू मध्यमवर्गीय महिलेची कथा सांगते, जिचा बालविवाह प्रथा असलेल्या समाजातील अन्याय सहन करून मृत्यू होतो. मराठी साहित्यातील ही एक उत्कृष्ट कादंबरी मानली जाते.
पण लक्षात कोण घेतो? च्या १८९० च्या प्रकाशना आधी कादंबऱ्या ह्या मनोरंजनासाठी लिहील्या आणि वाचल्या जात असे. ह्या कादंबरीने बाल विधवांच्या जीवनाचे अनावरण केले व पारंपारिक शैलीपासून एक महत्त्वपूर्ण अंतर ठेवून ही लिहीली गेली होती. आपटेयांनी ह्या आधी अनेक निबंध व टीका प्रकाशित केल्या होत्या. महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाशी संबंधित त्यांची पहिली कादंबरी मधली स्थिति १८८५ मध्ये प्रकाशित झाली होती.
पण लक्षात कोण घेतो?
थोडक्यात पण महत्त्वाचे.