रक्तातील रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पंडुरोग ’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त; रक्तकोशिकाधिक्य]. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनताउद्भवण्याचा नेहमी संभव असतो. पंडुरोगला इंग्रजी मध्ये अनेमिया असे म्हणतात.जगातील ३० टक्के लोकांमध्ये अनेमिया आढळून येतो. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १५०० दशलक्ष लोक अनेमिक आहेत. हा रोग मानवी शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तेव्हा होतो. रक्तक्षय ही एक अवस्था आहे, जिचे वैशिष्ट्ये लाल रक्तपेशींची संख्या किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणें असे असते. आयरन डेफिशिअंसी( लौहाची कमतरता) अनिमिआ, मेगाबालास्टिक अनिमिआ, अप्लास्टिक ॲनिमिया आणि बरेच काही प्रकारचे रक्तक्षय असतात. अवस्थेची कारणे वेगळी असू शकतात,जसे परजीवी संक्रमण, अत्यधिक रजोस्राव, गर्भधारणे आणि कुपोषण यांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तक्षती. रक्तक्षयामुळे थकवा, कमजोरी, फिकट त्वचा आणि श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. हेमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींची संख्या, परजीवी संसर्ग वगळण्यासाठी शौच चाचणी आणि अप्लास्टिक ॲनिमियाच्या बाबतीत अस्थिमज्जा चाचणीद्वारे निदान केले जाते. रक्तक्षयावरील उपचार त्याच्या मूळ कारणांवर अवलंबून असतो आणि पोषणातील कमतरता असलेल्या अनीमियाच्या बाबतीत योग्य पोषण आणि लोहपूरक समाविष्ट करू शकतो. संपूर्ण रक्तप्रत्यांतरणाद्वारे गंभीर रक्तक्षयाचा उपचार केला जातो. हेच बरोबर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंडुरोग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?