नोरोदोम सिहानूक [ a ] ( ; ३१ ऑक्टोबर, १९२२ - १५ ऑक्टोबर, २०१२) हा कंबोडियाचा राजा होता. नोरोदोम राजवंशाचा सिहानूक वेगवेगळ्या काळात कंबोडियाचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष सुद्धा होता. त्याच्या हयातीत कंबोडियावर अनेक राजवटींनी सत्ता गाजवली. यात फ्रेंच वसाहती राजवट (१९५३ पर्यंत), जपानचे बाहुले राज्य (१९४५), स्वतंत्र राज्य (१९५३-१९७०), लष्करी प्रजासत्ताक (१९७०-१९७५), ख्मेर रूज राजवट (१९७५-१९७९), व्हिएतनाम धार्जिणा साम्यवादी देश (१९७९-१९८९), एक संक्रमणकालीन साम्यवादी राजवट (१९८९-१९९३) आणि अखेरीस पुन्हा एकदा सार्वभौम राजतंत्र (१९९३-) अशी विविध रुपे देशाने घेतली..
सिहानूक हे राजकुमार नोरोदोम सुरामरित आणि राजा सिसोवाथ मोनिव्होंग यांची मुलगी राजकुमारी सिसोवाथ कोसमक यांचे एकुलते एक अपत्य होता. १९४१ मध्ये त्याच्या आजोबा मोनिव्होंगचे निधन झाल्यावर फ्रेंच व्हाइसरॉयने सिहानूकला राज्यपदी बसवले. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने कंबोडिया सोडल्यावर १९५३ मध्ये सिहानूकने फ्रांसपासून कंबोडियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. १९५५ सिहानूकने राज्य सोडून दिले व आपले वडिल सुरामरित यांना राजेपदी बसवून देशाच्या राजकारणात थेट भाग घेतला. सांगकुम या सिहानोकच्या पक्षाने त्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि सिहानूक कंबोडियाचा पंतप्रधान झाला. त्यांनी एक-पक्षीय राजवटीत देशावर राज्य केले आणि राजकीय विरोधकांना दडपले. १९६० मध्ये आपल्या वडिलांच्या निधनानंतर सिहानूकने कंबोडियाचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले.
अधिकृतपणे परराष्ट्र संबंधांमध्ये तटस्थ असूनही सिहानूक प्रत्यक्षात साम्यवादी देशांच्या गोटात होता. १९७० च्या कंबोडियन सत्तापालटात सिहानूकला पदच्युत केले गेले. त्यावेळी त्याने चीन आणि उत्तर कोरियामध्ये जाउन तेथून निर्वासित सरकार आणि प्रतिकार चळवळ चालवली. तेथून त्याने कंबोडियातील यादवीत ख्मेर रूजला पाठिंबा दिला. १९७५ मध्ये ख्मेर रूजच्या विजयानंतर सिहानूक पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाला. १९७६ पर्यंत ख्मेर रूज सरकारशी संबंध बिघडल्यावर त्याने राजीनामा दिला. १९७९ मध्ये व्हिएतनामी सैन्याने ख्मेर रूज उलथवून टाकेपर्यंत सिहानूकला नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
१९८१ मध्ये सिहानूकने पुन्हा एकदा परागंदा होत फंकिन्पेक नावाची चळवळ सुरू केली. १९८२मध्ये सिहानूकने काम्पुचियाच्या सामंजस्य सरकारमध्ये (सीजीडीके) राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारले. व्हियेतनामविरोधी गटांच्या युतीने संयुक्त राष्ट्रांमध्ये कंबोडियाचे प्रतिनधित्व केले. १९९० मध्ये सार्वभौम कंबोडियाची देखरेख करण्यासाठीच्या संक्रमणकालीन संस्थेच्या अध्यक्षपदी सिहानूकची निवड झाली. १९९३ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सिहानूकचा मुलगा नोरोदोम रणरिद्ध आणि हुन सेन यांनी युती सरकार स्थापन केले आणि सिहानूकला पुन्हा एकदा कंबोडियाचे राजेपद दिले गेले. २००४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पदत्याग केला आणि आपला मुलगा नोरोदोम सिहामोनी याला उत्तराधिकारी म्हणून निवडले. २०१२ मध्ये बीजिंगमध्ये सिहानूकचे निधन झाले.
१९४१ ते २००६ दरम्यान सिहानूकने सुमारे ५० चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आणि त्यांपैकी काहींमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या. निकृष्ट दर्जाचे हे चित्रपट आणि त्यातील गाणी देशभक्तीपर होती.
आधुनिक कंबोडियाला आकार देण्यात, विशेषतः देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे श्रेय सिहानूकला दिले जाते.
सिहानोक हे ६० वर्षांहून अधिक काळ कंबोडियन सार्वजनिक जीवनात आघाडीवर होते, त्यांनी विविध पदांवर काम केले आणि आधुनिक कंबोडियन इतिहासातील सर्वात परिणामकारक नेत्यांपैकी एक होते. खरंच, द गार्डियनचे प्रख्यात पत्रकार मार्टिन वूलाकॉट म्हणाले की, "आधुनिक काळात कोणत्याही सम्राटाने नोरोडोम सिहानोकइतके पूर्णपणे आपल्या देशाचे जीवन आणि भाग्य साकारलेले नाही."
नोरोदोम सिहानूक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.