निहाली ही भारतात महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्हातल्या जळगाव जामोद तालुक्यात बोलली जाणारी एक भाषा आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार जवळपास २००० लोक ही भाषा बोलतात. निहाली भाषेचे वैशिष्ट्य असे की ती जगातल्या इतर कुठल्याही भाषाकुळात न मोडणारी अशी स्वतंत्र भाषा आहे. यामुळे ती जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असण्याचा संभव आहे. स्पेनमधील बास्क भाषा निहालीप्रमाणेच स्वतंत्र भाषा आहे.
निहाली भाषा सुरुवातीला ऐकण्यास थोडी क्लिष्ट, किचकट वाटत असली तरी ती लवकर आत्मसात होऊ शकते. निहाली भाषा केवळ बोली स्वरूपात आहे. तिची स्वतंत्र लिपी नाही. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, चालठाणा, सोनबर्डी, कुॅंवरदेव, उमापूर, रायपूर तसेच संग्रामपूर तालुक्यातील शेंबा, चिचारी, वसाडी या आदिवासीबहुल गावांमध्ये पाचशेच्या जवळपास निहाल कुटुंबीयांची वस्ती आहे. त्यांची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. त्यापैकी काही जणांवर कोरकू भाषेचा परिणाम होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात 'निहाली'भाषेऐवजी 'कोरकू' भाषेने स्थान मिळविले आहे. परिणामी निहाली भाषा अस्तंगताकडे वाटचाल करीत आहे. भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात देशातील ४२ भाषा-बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले आहे. या अहवालात 'निहाली' भाषेचाही समावेश आहे.
निहाली भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.