निलगिरी प्रकारची फ्रिगेट

या विषयातील रहस्ये उलगडा.

निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. यांची बांधणी रॉयल नेव्हीच्या लिअँडर प्रकारच्या फ्रिगेटांवर आधारित आहे.

माझगांव डॉक लिमिटेडने इ.स. १९७२ ते इ.स. १९८१ दरम्यान या प्रकारच्या सहा फ्रिगेटा बांधल्या. २०१३नंतर या सगळ्या सेवानिवृत्त झाल्या. या नौकांना चौदाव्या फ्रिगेट स्क्वॉड्रनमध्ये शामिल करण्यात आले होते.

भारतीय आरमार याच नावाच्या नवीन वर्गात फ्रिगेटा बांधीत आहे. नवीन फ्रिगेटांना आधीचीच नावे दिली जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →