निमई बाली हा एक भारतीय अभिनेता आहे जो सामान्यतः सहाय्यक आणि खलनायक भूमिका करतो. तो लाडो २ या टीव्ही मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
बाली यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चंद्रकांता या टीव्ही मालिकेत सूर्याची भूमिका करून केली. त्यानंतर त्यांनी सीआयडी: स्पेशल ब्युरो या टीव्ही मालिकेत वरिष्ठ निरीक्षक प्रतापची भूमिका केली.
१९९७-२००० च्या जय हनुमान या हिंदी टेलिव्हिजन मालिकेत पवन देव, वाली या भूमिका साकारण्यासाठी तो ओळखला जातो, ज्याचे दिग्दर्शन संजय खान यांनी केले होते. २०००-२००२ च्या विष्णू पूराण या हिंदी टेलिव्हिजन मालिकेत त्यांनी भगवान विष्णूच्या रक्षक जयची आणि जयाच्या तीन असुर अवतारांपैकी दोन, हिरण्यकशिपू आणि रावणाची भूमिका साकारली होती. २००१ मध्ये त्याने जय महाभारत या मालिकेत दुर्योधनाची भूमिका केली. त्यांनी भाभी, कुमकुम - एक प्यारा सा बंधन, डोली सजा के, अंबर धारा, वो रहने वाली मेहलों की, युग आणि ओम नमः शिवाय या मालिकांमध्ये पण काम केले आहे.
बालीने अभिनेत्री साहिला चढ्ढाशी लग्न केले आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे. तो बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा चुलत भाऊ आहे.
निमई बाली
थोडक्यात पण महत्त्वाचे.