निढळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चंद्रकांत दळवी(भा.प्र.से) हे गावचे सुपुत्र महाराष्ट्राचे सहकार आयुक्त होते. गावाला 'आदर्श गाव' म्हणून संबोधले जाते. गावाला संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांक आला आहे. गावाला अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. अनेक मंत्री व नेत्यांनी गावाला भेटी दिल्या आहेत. गावात जलसंधरणासाठी कामे चालू आहेत. गावात हनुमान टेकडी हे प्रसिद्ध स्थळ आहे. तिथे एक हनुमानाची मूर्ती आहे. त्या टेकडीवरून मनमोहक निसर्गाचे दर्शन होते. गावाच्या बाजूने सातारा पंढरपूर हा महामार्ग जातो.पुढे हा महामार्ग सोलापूर व हैदराबाद ला जातो. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाचा सेन्सस कोड ५६३४८८ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या ५००० आहे. गावात ७९७ कुटुंबे राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निढळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.