भारताची प्रादेशिक उपग्रह दिक् चालन पद्धति (NavIC) ही भारताची उपग्रहांच्या साह्याने संचालित होणारी दिशा दर्शक यंत्रणा आहे. इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (Indian Regional Navigation Satellite System (IRNSS))चा भाग NavIC नाविक या नावाने ती प्रचलित आहे. देशातल्या वापरकर्त्यांना अचूक स्थितीची माहिती देण्यासाठी नाव्हीक बनवली गेली आहे. अनेक भारतीय भाषांत नाविक या शब्दाचा अर्थ नावाडी असा होतो. ही यंत्रणा आता उपयोगात आणलेली आहे. आहे. ही यंत्रणा नेमकी वास्तवकालीन स्थिती आणि वेळेविषयी माहिती पुरवू शकेल, ही स्वायत्त उपग्रह दिक् चालन यंत्रणा भारताचा संपूर्ण भूभाग आणि त्याच्याभोवतीच्या १५०० किलोमीटर परिसर एवढ्या क्षेत्रात वापरता येईल. भविष्यकाळात हा परीघ आणखी वाढवण्याची योजना आहे. नागरी आणि लष्करी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी या व्यवस्थेचा वापर करण्याची योजना आहे.
सद्यस्थितीत सात उपग्रहांचा समुह त्यासाठी वापरला जाणार असून त्यासाठीचा सातवा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थापित करण्यात आला. आयआरएनएसएस-१ (इंडियन रीजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम -१) या आद्याक्षरांनी ही उपग्रह मालिका ओळखली जाते. भारताने अमेरिकेच्या जागतिक स्थितीदर्शक यंत्रणेच्या धर्तीवर (जीपीएस) स्वतःची दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत स्थान मिळविले आहे.
सध्या जगात अनेक देशांच्या अशा उपग्रह दिक् चालन पद्धती अस्तित्वात आहेत. अमेरिकेची जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) ही त्यापैकीच एक आहे. स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली असलेल्या ५ देशांपैकी भारत एक बनला आहे. त्यामुळे दिशादर्शनासाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.
ही यंत्रणआ अचूक रीअल-टाइम स्थान आणि वेळ सेवा प्रदान करते. हे भारत आणि त्याच्या आजूबाजूला १,५०० किमी (९३० मैल) पर्यंत पसरलेल्या प्रदेशास व्यापते आणि पुढील विस्ताराची योजना आहे. या प्रणालीमध्ये सध्या सात उपग्रहांचा नक्षत्र आहे आणि जमिनीवर उभे असलेले दोन अतिरिक्त उपग्रह आहेत.
नाविक (दिक्चालन यंत्रणा)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.