नागालँड विद्यापीठ हे नागालँड राज्यात १९८९ मध्ये भारत सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय लुमामी, झुन्हेबोटो जिल्हा येथे आहे. इतर दोन कायमस्वरूपी कॅम्पस मेरीमा (कोहिमा जवळ) आणि मेडझिफेमा येथे आहेत. तसेच दिमापूरमध्ये एक तात्पुरता कॅम्पस आहे. एकूण ६८ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि एकूण विद्यार्थीसंख्या सुमारे २४,००० आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर ४३ शाखांमध्ये शिक्षणाची इथे व्यवस्था आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये १०१-१५० बँडमध्ये आणि एकूण १५१-२०० बँडमध्ये विद्यापीठाला स्थान देण्यात आले.
नागालँड विद्यापीठ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.