नस्य हा एक आयुर्वेदिक उपचार आहे.
नाकात औषध घालणे. निरोगी मनुष्याने नेहमी नस्य सेवन केले, तर त्याची त्वचा, खांदे, मान, छाती भरदार, वर आलेली व प्रसन्न असतात. इंद्रिये बळकट व केश काळे असतात. गळसरीच्या वर मान व डोके यांतील सर्व कफवातज विकार होऊ नयेत म्हणून व झाले, तर ते नाहीसे करण्याकरिता नस्य सेवन करावे. नाक हे डोक्याचे द्वार आहे म्हणून नस्याचा उपयोग होतो.
याचे
दोष बाहेर काढणारे विरेचन,
वातशामक व बलपुष्टी देणारे बृंहण व
दोषांचे शामक शमन असे उपयोगानुसार प्रकार आहेत.
विरेचन नस्य शिरःशूल सूज, गळ्याचे विकार, कृमी, ग्रंथी अपस्मार, पीनस इत्यादींवर उपयुक्त. बृंहण नस्य वातजशूल, सूर्यावर्त, स्वरक्षय, अडखळत बोलणे, अवबाहुक इत्यादींवर व शमन नस्य नीलिका, वांग, केशदोष, टक्कल, डोळे लाल असणे इत्यादींवर उपयुक्त.
नस्य
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.