नवयान (प्रकाशन गृह)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नवयान हे आंबेडकरी विचारांवर जोरदार प्रभाव असलेले नवी दिल्लीतील एक स्वतंत्र जातिविरोधी भारतीय प्रकाशन गृह आहे. एस. आनंद आणि डी. रविकुमार यांनी २००३ मध्ये याची स्थापना केली होती. या प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आंबेडकर : ऑटोबायोग्राफिक नोट्स होते, ज्याची किंमत ४० रुपये इतकी होती. तेव्हापासून या प्रकाशनाने कल्पित कथा, नॉन-फिक्शन, ग्राफिक कादंबऱ्या आणि काव्ये-कविता प्रकाशित केल्या आहेत. २००९ पासून, नवयानाने जातीव्यतिरिक्त इतर सामाजिक विषयांचा समावेश करण्यासाठी आपला प्रकाशनाचा परिप्रेक्ष्य वाढविला, कारण 'जातिविरुद्धचा संघर्ष हा न्याय आणि समानतेसाठीच्या इतर संघर्षांपासून वेगळा राहू शकत नाही' असे प्रकाशनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →