नग्नसत्य: बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

'नग्नसत्य' लेखीका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा आंतरवेध घेणारे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. या ग्रंथामध्ये मुख्यत्वे बलात्कारासबंधीत अनेक घटनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बलात्काराच्या प्रश्नाचा शोध लेखीका मुक्ता मनोहर यांनी घेतलेला आहे.

मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. ज्यात त्या अनेक केसेस चा आढावा घेऊन अशा घटनांना राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसे हाताळले जाते याची सविस्तरपणे मांडणी करतात. या पुस्तकात बलात्कारी वेताळाची कहाणीच्या स्वरुपात मांडणी केली आहे. बलात्कारी वास्तवाचा वेध म्हणजे बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरा आणि स्वतः स्त्रीयांनाच अशा घटनांना कारणीभूत ठरवल्या जाते, असा प्रयत्न समाज पातळीवर सुरू आहे, हे त्या लक्षात आणून देतात. आणि पुरुष हा कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे लक्षात आणून देतात.

“बलात्काराच्या घटना जेव्हा न्याय मागण्यासाठी न्यायालयाकडे नेल्या जातात, तेव्हा त्यांची कशा प्रकारे खिल्ली उडवली जाते आणि बलात्कारित स्त्रिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, किवा ती स्त्रीच पुरुषांना मोहात पाडते आणि पुरुष विकृतीतून बलात्कार होतो अशी कारणे पुढे येत असल्याचे लेखिका सिद्ध करतात."बलात्काराच्या समस्येचा शोध घेताना, अशा घटना सत्ता-संबंधातून, जातीच्या कारणावरून, किवा बाजारपेठीय वर्चस्ववाद याला कारणीभूत ठरतात हे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले गेले आहे. परंतु बलात्काराच्या घटने मध्ये पिढीत झालेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना, जनसमुदाय, माध्यमे , आणि काही निवडक लोकांनी घेतलेला आक्षेप यांची भूमिका महत्त्वाची असते.

या पुस्तकात बलात्कारी पुरुषाशी काल्पनिक स्वरुपात संवाद साधून प्रत्यक्षात त्याची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →