नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.अश्वपालनात व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युद्धाचे प्रमुख अस्त्र होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नकुल
या विषयातील रहस्ये उलगडा.