ध्रुवीय प्रकाश किंवा ॲरोरा किंवा नॉर्दर्न लाइट्स (अरोरा बोरेलिस) किंवा सदर्न लाइट्स (अरोरा ऑस्ट्रेलिस) हे पृथ्वीच्या आकाशातील एक नैसर्गिक प्रकाश प्रदर्शन आहे. हे प्रामुख्याने उच्च-अक्षांश प्रदेशांमध्ये (आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या आसपास) पाहिले जाते. हे तेजस्वी प्रकाशांचे गतिमान नमुने प्रदर्शित करतात जे पडदे, किरण, चक्राकार किंवा संपूर्ण आकाश झाकणारे दिसतात.
ध्रुवीय प्रकाश हा सौर वाऱ्यामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या व्यत्ययाचे परिणाम आहेत. ध्रुवीय प्रकाशहा सूर्यमालेतील बहुतेक ग्रह, काही नैसर्गिक उपग्रह आणि धूमकेतूंवर देखील दिसतो.
ॲरोरा हा शब्द पहाटेच्या रोमन देवीच्या नावावरून आला आहे, जी सूर्य येण्याची घोषणा करत पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत असे. बोरेलिस आणि ऑस्ट्रेलिस हे शब्द ग्रीक पौराणिक कथेतील उत्तरेकडील वारा ( बोरियास ) आणि दक्षिणेकडील वारा ( ऑस्टर ) या प्राचीन देवतांच्या नावांवरून आले आहेत.
ध्रुवीय प्रकाश
थोडक्यात पण महत्त्वाचे.