ध्रुव बाळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ध्रुव बाळ

विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरूचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्या शोधार्थ ध्रुवाने राजवाडा सोडून मधुवन नावाच्या अरण्याची वाट धरली. तेथून तो परत आला नाही.

काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. तो एका तारकापुंजातला शेवटचा, म्हणजे सातवा तारा आहे. या तारकापुंजाला ध्रुवमत्स्य (इंग्रजीत लिटिल बेअर) हे नाव दिले गेले आहे. आकाशातील सप्तर्षी (इंग्रजीत ग्रेट बेअर) या पतंगासारख्या दिसणाऱ्या तारका-समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांना सरळ रेघेने जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती ध्रुवताऱ्यापर्यंत पोचते.

ध्रुव ताऱ्याला इंग्रजीत pole star म्हणतात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →