धूमकेतू

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

]]

धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे.

धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.

धुमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच सच्छिद्र असते व शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखा आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची घनता अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग व अंतर्भाग मऊ असतो.

धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून(Solar nebula) बनलेल्या घन कचऱ्यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →