हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.
गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.
धारवाडी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.