देवदार

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

देवदार

देवदार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. देवदार हा वृक्ष वनस्पतिसृष्टीच्या पिनोफायटा प्रभागाच्या पायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा (cedrus deodard) आहे. वनस्पतिसृष्टीचे १३ ते १४ प्रभाग पाडले जातात. यांपैकी ४ प्रभाग अनावृत बीजी (ज्या वनस्पतींच्या बियांवर आवरण नसते अशा) वृक्षांचे आहेत. यातील पिनोफायटा हा एक प्रभाग आहे. देवदार वृक्ष मूळचा पश्चिम हिमालयातील असून उत्तर पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान, नेपाळ तसेच तिबेटमध्ये समुद्रसपाटीपासून १५००–३००० मी. उंची पर्यंत आढळतो.

देवदार या सदाहरित वृक्षाची उंची ४०–५० मी. असून तो सरळ वाढतो. साल फिकट तपकिरी असून तिचे उभे तुकडे सुटून पडतात. खोडावर असलेल्या आडव्या फांद्या आणि त्याला असलेल्या लोंबत्या उपफांद्यांमुळे त्याचा आकार शंकूसारखा (पिरॅमिड) दिसतो. पाने लहान, सुईसारखी, ३–५ सेंमी. लांब व टोकदार असून लांब फांद्यांवर एकेकटी तर छोट्या फांद्यांवर २०–३० च्या गुच्छात असतात. पानांचा रंग गडद हिरवा किंवा चमकदार निळसर दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →