देवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने दान केलेले हे ठिकाण आहे. इथली लाल माती, निळा समुद्र,आणि हिरवी झाडे, पर्यटकांना पुन्हा पुन्हा आकर्षित करतात.
देवगड किल्ला.
देवगडच्या विशाल समुद्राची रखवाली करणारा पहारेकरी म्हणजे देवगड किल्ला.
देवगड हा एक महत्त्वाचा सागरी किल्ला छ.शिवरायांच्या काळात १६व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेला.१६९० साली किल्ला्याचे बांधकाम पूर्ण झाले असावे.असे सांगण्यात येते
सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी बांधलेला किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. किल्ल्यात पाणी टाके, तटबंदी, पहारेकऱ्यांच्या जागा यांचे अवशेष मिळतात.
देवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
देवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे.
तसेच देवगड हे एक महत्त्वाचे बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
देवगड
थोडक्यात पण महत्त्वाचे.