दुलु माहतो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दुलु माहतो

दुलु माहतो (जन्म १२ मे १९७५) हे झारखंड, भारतातील राजकारणी आहेत. ते तीन वेळा आमदार होते आणि आता खासदार आहेत. त्यांनी झारखंडमधील २०२४ ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली आणि धनबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले.

माहतो हे २००९ पासून बागमारा (विधानसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधीत्व करत आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले परंतु २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर (८२४ मतांच्या अल्प फरकाने) निवडणूक लढवली आणि जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →