दीपक तिजोरी (जन्म २८ ऑगस्ट १९६१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता आहे जो बॉलीवूड आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करतो. आशिकी (१९९०), खिलाडी (१९९२), जो जीता वही सिकंदर (१९९२ ), कभी हाँ कभी ना (१९९४), गुलाम (१९९८) आणि बादशाह (१९९९) मधील त्याच्या सहाय्यक भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे. पेहला नशा (१९९३) मध्ये त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केले. तिजोरीने त्याच्या दिग्दर्शन कामाची सुरुवात उप्स! (२००३) ह्या पुरुष स्ट्रिपर्सबद्दलचा चित्रपटासोबत केली. यानंतर फारेब (२००५), खामोश... खौफ की रात (२००५), टॉम, डिक आणि हॅरी (२००६) आणि फॉक्स (२००९).हे चित्रपट आले. २००१ मध्ये भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लघु-मालिका थ्रीलर ॲट १० - फरेब साठी जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपक तिजोरी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.