दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय. भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:
पूर्व
उत्तर
पश्चिम
दक्षिण
वरील दिशा ह्या भूमितीय कंपास वरील विशिष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:
• पूर्व (पू.) :९०°
• उत्तर (उ.) :०°आणि ३६०°
• पश्चिम (प.) :२७०°
• दक्षिण (द.) :१८०°
या चार दिशांखेरीज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:
ईशान्य
नैर्ऋत्य
वायव्य
आग्नेय
भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:
ऊर्ध्व
अधर
दिशा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.