प्रा. दिलीप जगताप हे पुण्यात राहणारे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी ३० नाटके लिहिली असे त्यांनी एका लेखात म्हणले आहे.
दिलीप जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वाईमधील एका छोट्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण त्याच गावातील द्रविड हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या शाळेतील कृष्णराव गणेश सबनीस या सरांमुळे जगताप यांच्या मनातील गणित येत नसल्याचा न्यूनगंड दूर झाला आणि सरांच्या प्रोत्साहनामुळे ते कविता आणि नाट्यलेखन करू लागले.
दिलीप जगताप यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.
इ.स. १९५० नंतरच्या काळात प्रयोगशील रंगभूमीसाठी नाट्यलेखन करणारे ते एक महत्त्वाचे लेखक समजले जातात.
१९७२ मध्ये सत्यदेव दुबे हे करत असलेल्या संशोधनाचा एक भाग म्हणून पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात ६ दिवसांची नाट्यलेखन कार्यशाळा आयोजित केली होती. तिच्यात नाटककार म्हणून दिलीप जगताप यांचा सहभाग होता.,
दिलीप जगताप
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.