दिनेश सिंग

या विषयावर तज्ञ बना.

दिनेश सिंग (जुलै १९, इ.स. १९२५-नोव्हेंबर ३०, इ.स. १९९५) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि इ.स. १९६९ ते इ.स. १९७० आणि इ.स. १९९३ ते इ.स. १९९४ या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बांदा लोकसभा मतदारसंघातून, इ.स. १९६२ मध्ये तत्कालीन सलोन लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते राज्यसभेचेही सदस्य होते.

त्यांच्या कन्या राजकुमारी रत्ना सिंह ह्या देखील तीन वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →