दमन हा ४ मे २००१ रोजी प्रदर्शित झालेला कल्पना लाजमी दिग्दर्शित भारतीय हिंदी-भाषेतील नाट्यचित्रपट आहे. मुख्य अभिनेत्री, रवीना टंडन हिला दुर्गा सैकियाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट एका पीडित पत्नीची कथा आहे. चित्रपटाचे वितरण भारत सरकारने केले होते. गायक आणि संगीतकार दिवंगत मानस मुखर्जी यांचा मुलगा गायक शान याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दमन (२००१ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!