दक्षिण कोरियाची चित्रपटसृष्टी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

दक्षिण कोरियाची चित्रपटसृष्टी ही १९४५ पासून आतापर्यंतच्या दक्षिण कोरियाच्या चित्रपट उद्योगाशी संबंधित आहे. कोरियावरील जपानचा ताबा, कोरियन युद्ध, सरकारी सेन्सॉरशिप, व्यावसायिक क्षेत्र, जागतिकीकरण आणि दक्षिण कोरियाचे लोकशाहीकरण यांसारख्या घटनांचा दक्षिण कोरियन चित्रपटांवर खूप प्रभाव पडला आहे.

२० व्या शतकाच्या मध्यातील या चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात द हाउसमेड (१९६०) आणि ओबाल्टन (१९६१) असे दोन सर्वोत्कृष्ट दक्षिण कोरियन चित्रपट मानले जातात. कोरियन नव चळवळीचे उद्योगाचे पुनरुज्जीवन झाल्यावर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते आत्तापर्यंत या प्रकारच्या चित्रपटांनी देशातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट, द ॲडमिरल: रोअरिंग करंट्स (२०१४) आणि एक्स्ट्रीम जॉब (२०१९), तसेच अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपट तयार केले. यामध्ये गोल्डन लायन प्राप्तकर्ता चित्रपट पीएता (Pietà (२०१२)) आणि पाल्मे डी'ओर प्राप्तकर्ता आणि अकादमी पुरस्कार विजेता पॅरासाइट (२०१९) आणि ओल्डबॉय (२००३), स्नोपियर्सर (२०१३), आणि ट्रेन टू बुसान (२०१६) यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक चित्रपट समाविष्ट आहेत.

कोरियन चित्रपट उद्योगाच्या वाढत्या जागतिक यशामुळे आणि जागतिकीकरणामुळे, गेल्या दोन दशकांमध्ये ली ब्युंग-हुन आणि बे डूना सारखे अनेक कोरियन कलाकार अमेरिकन चित्रपटांमध्ये दिसू लागले आहेत. तसेच पार्क चॅन-वूक आणि बोंग जून-हो सारखे कोरियन कलाकार इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करू लागले आहेत, तर स्टीव्हन यून आणि मा डोंग-सेओक सारखे कोरियन-अमेरिकन कलाकार कोरियन चित्रपटांमध्ये काम करत आहेत. युनायटेड स्टेट्स, चीन आणि इतर बाजारपेठांमध्ये कोरियन चित्रपट पुनर्निमित केले जात आहेत. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव बनला आहे.

अमेरिकन फिल्म स्टुडिओंनी त्यांच्या स्थानिक कोरियन उपकंपन्या देखील स्थापन केल्या आहेत. लोटे कल्चरवर्क्स (पूर्वीचे लोटे एंटरटेनमेंट), सीजे एंटरटेनमेंट, नेक्स्ट एंटरटेनमेंट वर्ल्ड (नवीन) आणि शोबॉक्स या कोरियाच्या चार मोठ्या चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांशी (बिग फोर) थेट स्पर्धा करण्यासाठी आणि द एज ऑफ शॅडोज (२०१६) आणि द वेलिंग (२०१६) यांसारख्या कोरियन चित्रपटांना वित्तपुरवठा करण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स कोरिया आणि 20th सेंच्युरी फॉक्स कोरिया यांसारख्या कंपन्या पुढे आल्या.

नेटफ्लिक्सने कोरियामध्ये चित्रपट निर्माता आणि वितरक म्हणूनही प्रवेश केला आहे. तिथे त्यांची उपकंपनी असून इतर प्रतिस्पर्धी देखील आहेत. नवीन बाजारपेठांच्या शोधात आंतरराष्ट्रीय वाढीच्या धोरणाचा आणि डिझ्नीसोबतच्या स्पर्धेदरम्यान (ज्याला "स्ट्रीमिंग वॉर" असे म्हणले जाते), त्यादरम्यान अमेरिकन बाजारपेठेत ग्राहकांसाठी नवीन सामग्री शोधण्याची त्यांची मोहीम या दोन्हींचा भाग म्हणून कोरियन चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →