तुम ही हो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

"तुम ही हो" हे २०१३ चा भारतीय चित्रपट आशिकी २ मधील एक हिंदी भाषेतील प्रेमगीत आहे. हे गीत अरिजित सिंगने गायले आहे आणि मिथूनने संगीतबद्ध आणि लिहिले होते. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यावर चित्रित केलेले हे गीत भूषण कुमार यांनी टी-सीरीज अंतर्गत प्रदर्शित केले. गाण्याची लोकप्रियता वाढली आणि आठ आठवडे प्लॅनेट बॉलीवूडच्या शीर्ष १० मध्ये राहिले आणि एमटीव्ही इंडियाच्या शीर्ष२० मध्ये सात आठवडे पहिले स्थान पटकावले. याला युट्यूबवरती ७००+ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →