तुतारी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

तुतारी

तुतारी (स्त्रीलिंगी नाम; अनेकवचन: तुताऱ्या) हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर (म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्याचे) वाद्य आहे. ही आकडेबाज वळणाची, म्हणजे साधारणतः इंग्रजी 'सी' किंवा 'एस' आकाराची असते व तिचा आकार वाजविणाऱ्याच्या तोंडाकडे निमुळता होत आलेला असतो. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे किंवा प्राण्यांच्या शिंगाचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुताऱ्या बनवल्या जातात.

तुतारीला 'शृंग', 'रणश्रृंग', 'सिंगा', 'कुरुडूतू' किंवा 'कोम्बू' असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →