तिरू नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. तिरू नदीचा उगम चाकूर तालुक्यातील रोहिणा गावच्या डोंगरातून झाला आहे. या नदीवर मोरतळवाडी येथे तिरु मध्यम प्रकल्प आहे. तिरु नदीवर हाळी, हंडरगुळी,बेलसांगवी येथे एक प्रकल्प झाला आहे.तिरुका, डोंगरगाव, डोंगरगाव तांडा, सुल्लाळी, मरसांगवी, चिंचोली, अतनूर, गव्हाण, हातराळ, बामणी, वळंकी ही गावे वसलेली आहेत. तिरू ही नदी पुढे लेंडी नदीस मिळते. मुक्रमाबादच्या पूर्वेस ८ किलोमीटर वर लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ या वर्षापासून हा लेंडी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिरू नदी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?