ताल

या विषयावर तज्ञ बना.

उत्तर हिंदुस्तानी संगितात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्र्यांचा झपताल किंवा ७ मात्र्यांचा रुपक. तालाने सांगितिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेवून तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगितिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच बढत घेत तबलजी दृत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्र्यांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगितिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्र्यांचा कायदा वाजवून समेवर येता येते.

संगितास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →