ताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेन्नई शहरातील ४थे हॉटेल आहे. याचे आधीचे नाव ताज माऊंट रोड होते. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपच्याच ताज कनेमारा हॉटेलच्या दुसऱ्या बाजूस आहे. ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल आणि ताज फिशरमन्स कोव्ह अशी आहेत. हे हॉटेल ताज जीव्हीके हॉटेल्स आणि रिझॉर्ट्स लिमिटेडच्या मालकीचे आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले. हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कॅटॅलो यांनी केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ताज क्लब हाऊस (चेन्नई)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?