तांबडी शैल तिरचिमणी (इंग्लिश:Rufous Rock Pipit) हा आकाराने बुलबुलएवढा पक्षी आहे.
या पक्ष्याचा वरील भागाचा रंग तपकिरी असतो. डोके व पाठीवर फिक्कट रेषा, पिवळट वर्णाची भुवई असते तर पंख व शेपटीचा वर्ण गर्द असतो. शेपटीची किनार पांढुरकी, खालील भाग आणि गळा पांढुरका असतो. उरलेला भाग गुलाबी असतो. पिवळट छातीवर तपकिरी रंगाच्या फिक्कट रेषा असतात.
तांबडी शैल तिरचिमणी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.