तवी नदी ही भारत-प्रशासित जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तान-प्रशासित आझाद जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू प्रदेशातून वाहणारी नदी आहे. तवी ही चिनाब नदीची डाव्या तीरावरची एक प्रमुख उपनदी आहे.
तवी नदी डोडा जिल्ह्यातील भादरवाह येथील कैलास कुंड हिमनदी (ज्याला काली कुंड असेही म्हणतात) पासून उगम पावते. त्याचा पाणलोट प्रदेश सुमारे २१६८ किमी² आहे.
तवी नदीची लांबी सुमारे १४१ किमी (८८ मैल) आहे. साधारणपणे नदी दोन्ही बाजूंच्या उंच टेकड्यांमधून वाहते, फक्त सुमारे ३५ किमी (२२ मैल) लांबीचा खालचा भाग वगळता जिथे काही सपाट मैदानी भाग आहेत. जम्मू शहरात नदी सुमारे ३०० मी (९८० फूट) रुंद आहे.
जम्मू शहर ओलांडल्यानंतर, नदी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जाते आणि चिनाब नदीला मिळते.
जम्मूच्या स्थानिक लोकांमध्ये या नदीला धार्मिक महत्त्व आहे व तिला. "सूर्यपुत्री" म्हणून ओळख आहे जी प्राचीन हिंदू ग्रंथ विष्णुधर्मोत्तर पुराणात आढळते. स्थानिक पौराणिक कथेनुसार, राजा पेहर देवता यांनी त्यांच्या आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी ही नदी जम्मू शहरात आणली होती.
तवी नदी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.