तणमोर पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा आहे. वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते. गवताळ माळराने, सोबत कोरडवाहू शेती या सारख्या मिश्र ढिकाणी हा पक्षी राहतो. अत्यंत सावध, लाजाळू असल्याने क्वचितच दिसतो. नर विणीच्या हंगामात मादिला रिझवण्यासाठी साधारण ४ फुटांच्या उड्या मारतो, याच वेळी तणमोराचे नर दृष्टिपथात येतात
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तणमोर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.