डोरोथी पार्कर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डोरोथी पार्कर

डोरोथी पार्कर (पूर्वाश्रमीची रॉथशिल्ड; ऑगस्ट २२, इ.स. १८९३:लॉंग ब्रँच, न्यू जर्सी, अमेरिका - जून ७, इ.स. १९६७:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही इंग्लिश कवयित्री, साहित्यिक समीक्षक आणि कथालेखिका होती.

न्यू यॉर्कमध्ये स्थायिक असलेल्या पार्कर तिच्या तिखट उपरोधिक वक्तृत्वांसाठी आणि विसाव्या शतकातील शहरी मानवी स्वभावदोषांचे अचूक निरीक्षण करण्यासाठी प्रसिद्ध होती.

द न्यू यॉर्कर सारख्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या तिच्या साहित्यिक कृतींमुळे आणि अल्गॉनक्विन राउंड टेबल या लेखक समूहाची संस्थापक सदस्य म्हणून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला पार्करने पटकथा लेखनासाठी हॉलीवूडचा मार्ग धरला. तेथील तिच्या कारकीर्दीत तिला दोन ऑस्कर पुरस्कारांची (ॲकॅडमी अवॉर्ड्स) नामांकने मिळाली; मात्र तिच्या डाव्या राजकीय विचारसरणीतील सहभागामुळे तिचा समावेश हॉलीवूडच्या ब्लॅकलिस्टमध्ये करण्यात आला आणि तिच्या यशस्वी कारकीर्दीला खीळ बसली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →