डर्मॉट मुलरोनी

या विषयावर तज्ञ बना.

डर्मॉट मुलरोनी

डर्मॉट पॅट्रिक मुलरोनी (जन्म ३१ ऑक्टोबर १९६३) एक अमेरिकन अभिनेता आहे. रोमँटिक कॉमेडी, वेस्टर्न आणि नाट्य चित्रपटांमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

मुलरोनी लाँग गॉन (१९८७), यंग गन्स (१९८८), स्टेइंग टुगेदर (१९८९), व्हेअर द डे टेक्स यू (१९९२), पॉइंट ऑफ नो रिटर्न (१९९३), द लास्ट आउटलॉ (१९९३), एंजल्स इन द आउटफिल्ड (१९९४), माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग (१९९७), अबाउट श्मिट (२००२), द वेडिंग डेट (२००५), झोडीयाक (२००७), ऑगस्ट: ओसेज काउंटी (२०१३), यांसारख्या विविध चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जाते.

२००३ मध्ये, मुलरोनीने फ्रेंड्स या टीव्ही मालिकेत गॅविन मिशेलची भूमिका केली. तो नवव्या सीझनच्या तीन भागांमध्ये दिसला.

मुलरोनीने १९९० मध्ये अभिनेत्री कॅथरीन केनरशी लग्न केले. त्यांना क्लाईड कीनर मुलरोनी (जन्म २१ जून १९९९) नावाचा मुलगा आहे जो एक गायक आहे. मे २००५ मध्ये हे जोडपे विभक्त झाले आणि मुलरोनीने ११ जून २००७ रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. १९ डिसेंबर २००७ रोजी त्यांचा घटस्फोट अंतिम ठरला. नंतर २००८ मध्ये त्याने इटालियन प्रिमा अपोलिनारेशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत आणि कुटुंब लॉस एंजेलिसमध्ये राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →