डंकी हा २०२३ चा भारतीय हिंदी -भाषेतील विनोदी नाट्य चित्रपट आहे जो बेकायदेशीर इमिग्रेशन तंत्रावर आधारित आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी जिओ स्टुडिओज आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटसह बनवला आहे. हिरानी ह्यांनी ह्यात सह-लेखन, सह-निर्मिती, संपादन आणि दिग्दर्शन केले आहे. यात शाहरुख खान, तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांच्या भूमिका आहेत.
डंकी २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडून मिश्र-ते-सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. डंकीने १२० कोटी (US$२६.६४ दशलक्ष) च्या उत्पादन आणि विपणन बजेटच्या तुलनेत जगभरात ४७० कोटी (US$१०४.३४ दशलक्ष)ची कमाई केली, २०२३ चा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि २०२३ मधील आठवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट झाला. ६९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला नऊ नामांकन मिळाले, आणि कौशलने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकला.
डंकी (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.