ट्रॅक्टर हे कोणतीही गोष्ट सहजतेने ओढून नेता यावी या साठी बनवले गेलेले वाहन आहे.
याचा उपयोग शेती साठी होतो.(कर्षित्र, कर्षक). गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे; तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील टाक्या; सामान लादलेले चालीत डबे (अनुवाहन, ट्रेलर) वगैरे ओढण्यासाठी वापरावयाचे स्वयंचलित शक्तिसाधन. अचल यंत्रेही ट्रॅक्टर (त्यावरील कप्पी-पट्ट्याच्या मदतीने) चालवू शकतो. ट्रॅक्टर हे केवळ चाके लावलेले एंजिन असते आणि त्यामुळे स्वतः ट्रॅक्टरावर सामान वगैरे काही लादता येत नाही. तरी पण हे विविध प्रकारची कामे करणारे बहुगुणी यंत्र आहे.
ट्रॅक्टर जनावरांऐवजी नुसते ओढण्याचे कामच करीत नाही; तर तो मालसामान भरण्याचे, कणसे-लोंब्या खुडण्याचे, कापण्याचे, फवारा मारण्याचे, झोडण्याचे, थप्प्या लावण्याचे वगैरे माणसांनी करावयाची कामेही करू शकतो. त्याचा सर्वांत जास्त उपयोग शेतीसाठी, पड जमीन नांगराखाली आणण्यासाठी आणि मोठाल्या बांधकामात होतो. भारतात त्याचा प्रसार मुख्यत्वे शेतीसाठी होत आहे.
ट्रॅक्टर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.