टॉय स्टोरी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

टॉय स्टोरी

टॉय स्टोरी(१९९५) हा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने प्रदर्शित केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे. टॉय स्टोरी मालिकेतील पहिला चित्रपट आहे.

हा जगातील पहिला संपूर्ण संगणक-अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट होता. तसेच पिक्सारचा पहिला फीचर चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन लॅसेटर यांनी केले. (त्यांच्या फिचर चित्रपट दिग्दर्शनातील पदार्पण होते.) जॉस व्हेडन, अँड्र्यू स्टॅन्टन, जोएल कोहेन आणि अलेक सोकोलो यांनी पटकथा लिहली. तर कथा लॅसेटर, स्टॅन्टन, पीट डॉक्‍टर आणि जो रॅन्फ्ट यांची होती. या चित्रपटात रॅन्डी न्यूमन यांचे संगीत आहे. बोनी अरनॉल्ड आणि राल्फ गुगेनहेम यांनी निर्मिती केली आणि स्टीव्ह जॉब्स आणि एडविन कॅटमुल यांनी कार्यकारी-निर्मिती केली.

या चित्रपटात टॉम हँक्स, टिम ॲलन, डॉन रिक्ल्स, वॉलेस शॉन, जॉन रॅटझेनबर्गर, जिम वॉर्नी, ॲनी पॉट्स, आर. ली एर्मी, जॉन मॉरिस, लॉरी मेटकाल्फ आणि एरिक वॉन डिटेन यांचे आवाज आहेत.

चित्रपटाचे कथानकात माणसे नसताना खेळणी जिवंत होतात. वुडी नावाचा जुन्या पद्धतीची पुल-स्ट्रिंग काउबॉय बाहुला आणि आधुनिक अंतराळवीर अ‍ॅक्शन फिगर, बझ लाइटइयर यांच्यावर कथा केंद्रित आहे. अँडी डेव्हिस या त्यांच्या मालक असलेल्या मुलाच्या प्रेमासाठी दोघांमध्ये स्पर्धा असते. अँडीपासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी एकत्र काम करतात.

या चित्रपटानी जगभरात ३६१ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट इतका गाजला की त्यानंतर त्याचे आणखी दोन भाग टॉय स्टोरी २ (१९९९) व टॉय स्टोरी ३ (२०१०) मधे प्रदर्शित झाले. ह्या दोन्ही चित्रपटांना देखील प्रचंड यश मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →