(Ta) (अणुक्रमांक ७३) रासायनिक पदार्थ. पृथ्वीवर याचे अस्तित्त्व ०.०००२ % भरते. टांटालमचे १३० पेक्षा जास्त खनिजे सापडतात पैकी टॅंटालाइट हे प्रमुख खनिज आहे.
टांटालम हा करड्या रंगाचा उजळ धातू असून त्यास निळी छटा आहे. त्याचा वितळणबिंदू ३०००° से. असून याबाबतीत केवळ टंग्स्टन आणि ऱ्हेनियम हेच काय ते टांटालमच्या पुढे आहेत. टांटालमच्या मदतीने अनेक प्रकारची यांत्रिक कामे उत्तमप्रकारे करता येतात. त्याचा पत्रा केवळ ०.०४ मि. मी. जाडीचा असू शकतो आणि त्याची तारही तयार करता येते.
टांटालमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तो ऍक्वा रेजिया आणि नायट्रिक आम्लातही विरघळत नाही म्हणून रसायन उद्योगातील एक महत्त्वाचा धातू अशी टांटालमची ओळख आहे. आम्ले निर्माण होणाऱ्या कारखान्यात टांटालमचे साहित्य वापरले जाते. हायड्रोक्लोरिक, सल्फ्यूरिक, नायट्रिक फॉस्फॉरिक व ऍसेटिक आम्ले, हायड्रोजन पेरॉक्साईड, ब्रोमिन आणि क्लोरिन निर्मिती क्षेत्रात टांटालम वापरले जाते. फक्त हायड्रोफ्ल्यूरिक आम्ल आणि टांटालमचे जमत नाही.
टॅन्टेलम
थोडक्यात पण महत्त्वाचे.